दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार, किट्टी आडगावचे माजी सरपंच बाबांना नाना आगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

प्रवेशांनी मोहन जगताप यांची ताकत वाढली,विजयाकडे वाटचाल – नितीन नाईकनवरे

दिंद्रुड चे सरपंच अजय कोमटवार किट्टी आडगावचे माजी सरपंच बाबांना नाना आगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

प्रवेशांनी मोहन जगताप यांची ताकत वाढली,विजयाकडे वाटचाल – नितीन नाईकनवरे

माजलगाव – माजलगाव विधानसभा निवडणुकीत रंगत आली असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन जगताप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. दिंद्रुड चे सरपंच अजय कोमटवार व किट्टी आडगाव चे माजी सरपंच बाबांना नाना आगे सह मित्र मंडळांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीमध्ये शनिवार रोजी जाहीर प्रवेश केल्याने मोहन जगताप यांची ताकद वाढली असून त्यांनी विजयाकडे वाटचाल असल्याचे प्रतिपादन माजी सभापती नितीन नाईक नवरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पार्टी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली त्यावेळेपासून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचार चालू होताच मतदार संघातील अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी जाहीर प्रवेश करून मोहन जगताप यांना ताकद दिली आहे. निवडणूक येत्या दोन दिवसात आली असतानाच माजलगाव मतदार संघातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या दिंद्रुड चे विद्यमान सरपंच अजय कोमटवार, माजी सरपंच दिलीप कोमटवार,ग्रामपंचायत सदस्य मधुकर देशमाने,,पिल्लू आप्पा कोमटवार,विक्की सेठ, नारायण चांगभले बाबासाहेब जाधव भारत गोंधळ निहाल शेख यासह किट्टी आडगाव चे माजी सरपंच बाबांना नाना सह त्यांच्या मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी शनिवार रोजी माजी सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी भव्य जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने मोहन जगताप यांचे पारडे जड झाले असून त्यांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. मोहनराव जगतापगड जातीला सर्व धर्मांना मान्य असलेले एकमेव नेतृत्व आहे त्यांचा विजय ही खळ्या दगडावरचे रेघ आहे.येत्या दोन दिवसात माजलगाव मतदार संघातील अनेक सरपंच, उपसरपंच पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याचे माझी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन नाईक नवरे यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व माजलगाव मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.