प्रचाराची धावपळ…. गाडीतच झोप…. रस्त्यावरच जेवणं

माजलगाव : माजलगाव विधानसभेची रणधुमाळी जोरदार चालू असताना राष्ट्रवादी चे उमेदवार मोहनराव जगताप यांच्यासह संपूर्ण परिवार रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत आहे. स्वतः जगताप हे तीन तासा पेक्षा ज्यास्त झोप घेत नाही.जमलं तर आर्धातास चालत्या गाडीतच झोप घेत आहेत.प्रचाराच्या धावपळीत जेवणासाठीही वेळ मिळत नाही. आसाच एक प्रकार कॅमेऱ्यात टिपला गेला आसरडोह सर्कल मध्ये असताना अरणवाडी गावाच्या शिवावरच मोहनराव जगताप यांनी गाडी उभा करून कार्यकर्त्यांसाह घाईघाईत “दशमीचा” आनंद घेतला.