फ्लाईंग बर्ड्स अकॅडमीत पालक मार्गदर्शन शिबिर संपन्न.

माजलगाव (प्रतिनिधी)

दि.30 नोव्हेंबर 2024काल शनिवार रोजी फ्लाईंग बर्डस अकॅडमी माजलगाव शाळा येथे पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन फ्लाईंग बर्ड्स कार्यक्रमास प्रमुख अतिथी सेलू येथील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य आबासाहेब सावंत यांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सारिका बजाज या होत्या यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगजी चांडक यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ऍड.विष्णू सावंत तसेच हभप हनुमान आहेर पंढरपूरकर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सोपानराव पवार,ऐश्वर्या चांडक सौ.माया चांडक, संचालक प्रभाकर शेटे,अण्णासाहेब तौर,वसंत पाटील भगवान लाटे जगदीशजी चांडक,राहुल चांडक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष ऍक्टिव्हिटी साठी मुलांना प्रोत्साहनपर स्टार स्टुडन्ट अवार्ड देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी पालकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. तसेच, मुलांच्या शिक्षण, मानसिक आरोग्य आणि तांत्रिक युगातील आव्हाने यावर उपाय सुचवले.शिबिरात पालकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये तज्ञांनी शंका समाधान केले. विविध विषयांवर सखोल चर्चा झाली आपल्या पाल्याशी संवाद साधण्याचे कौशल्य मुलांना अभ्यासात गोडी कशी लावावी.

तंञज्ञानाचा योग्य वापर आणि मर्यादा इत्यादी विषयावर मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन काकडे मॅडम यांनी केले हा उपक्रम पालक व विद्यार्थ्यांमधील नाते अधिक मजबूत करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यकामास पालकांनी उपस्थित राहून पालक मार्गदर्शन शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.