मोहनराव जगताप यांना विजयी करून भाजप महायुतीचा बदला घ्या – अमोल डाके, सुनील शिंदे

माजलगाव :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून सत्ता हिसकावून घेणाऱ्या, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्ष व चिन्ह पळवणाऱ्या भाजप महायुतीचा बदला घेण्याची खरी वेळ आता आली आहे.

अंतरावली गोळीबारचा बदला घेण्याची खरी वेळ आता आली आहे हा बदला घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त महाविकास आघाडीस मतदान करावे असे प्रतिपादन कॉर्नर सभेत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमोल डाके, राष्ट्रवादी चे सुनील शिंदे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आ बाजीराव जगताप, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस, नारायण डक, ऍड नारायण गोले उपस्थित होते. पुढे बोलताना अमोल डाके म्हणाले की मोहनराव जगताप यांचा विजय ही काळ्या दगदावरची रेष आहे.

लोकसभे प्रमाणे सर्वांनी एकजुटीने विधानसभेला मतदान करून विजयी करावे.