माजलगाव ( प्रतिनिधि ) : माजलगाव मतदार संघात दोन धरणाचे पाणी आहे गोदावरी कुंडलिका सिंदफना सारख्या मोठ्या नद्या आहेत. काळी कसदार गंगथडीची जमीन आहे. महाराष्ट्रातील एकमेव मतदार संघ, ज्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले.तीन साखर कारखाने आहेत येथील शेतकरी हा इमानदार आणि कष्टाळू.आहे मग हा मतदार संघ विकासात मागे आहे याचं कारण-येथील नेतृत्वात असलेला इच्छाशक्ती चा अभाव.आहे मला फक्त एक संधी द्या विकासाचा सगळा बॅकलॉग मी भरून काढतो असे आवाहन महाविकास आघाडीचे तरुण तडफदार उमेदवार मोहन जगताप यांनी माजलगाव मतदार संघतील मतदाराना केले आहे स्व.दादासाहेब रांजवण यांनी मुहुर्तमेढ रोवलेली आणि नितीनराव नाईकनवरे यांनी फुलवलेली मार्केट यार्ड आज मोडकळीस आलेली आहे. येथील आमदारांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचे काही देणेघेणे नाही. रस्ते, पाणी अश्या भौतिक सुविधा असणारी औद्योगिक वसाहत आज भग्न झाली असून मंजूर असलेले 33 के.व्ही.सबस्टेशन देखील उभारता न आल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने उद्योगधंदे बंद पडत आह. एमआयडीसी तील उद्योगधंदे बंद पडल्याने येथील तरूणांना बेरोजगारी च्या खायीत लोटण्याचे महापाप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना स्वतः चा भाजीपाला विकण्यासाठी आजही बाजारतळ नसल्याने रस्त्यावर, नालीवर बसून विकावा लागतो, हे सर्वात मोठे दुर्दैव. भर पावसाळ्यात माजलगाातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरत असून रस्ता रूंदीकरण, नाली नसल्याचा परिणाम आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी धारूर घाटाच्या रूंदीकरणाकडे लक्ष दिले असते तर आजपर्यंत गेलेले शेकडो निरपराध जीव वाचले असते. स्वतः च्या साखर कारखान्याचे कर्मचारी दीपावली सणात उपाशी ठेवणारे तुम्हाआम्हाचे काय भले करणार? येथील मतदार संघात निघालेली गुत्तेदारी कामे पर जिल्ह्यातील गुत्तेदारांना दिल्याने येथील तरूणांना वाऱ्यावर सोडण्याचे कटकारस्थान सध्याच्या आमदारांनी केले.आहे त्यांना घरी बसवा आणि एक संधी मला द्या असे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांनी केले आहे.
Related Posts
मोहन दादा जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार : सुधाकरराव देशमुख, बप्पा देशमुख, संतोष काटकर
माजलगाव:( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदानामध्ये शहरातून मोहन दादा जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार…
स्वाधार योजनेतील जाचक अटी काढून टाका-प्रा.शिलवंत गोपनारायण
छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी ) आज दि. २७/१२/२०२४ रोजी त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायण यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त,…
2014-19 चा काळ आठवा, उपऱ्या उमेदवारास थारा देऊ नका – माजी आमदार बाजीराव जगताप
माजलगाव ( प्रतिनिधी ) 2014 ते 19 या काळात उपरा उमेदवार आमदार केल्यामुळे माजलगाव मतदारसंघतील जनतेने खूप काही भोगलं आहे.…