माजलगांव (प्रतिनिधी ) शहरातील पुरातन सर्वांचे कुलदैवत व आराध्य दैवत जागृत देवस्थान श्री. खंडोबा मंदीरात 29 नोव्हेबर शुक्रवार रोजी भक्तांचा उपस्थित घटस्थापना करण्यात आली व यात्रे ला प्रारंभ करण्यात आला आहे. चंपाष्टी यात्रा निम्मित मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे चे आयोजन केले आहे.तरी सर्वा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आसे अवाहन तुम्ही आम्ही सर्व भक्तंजनाने केले आहे.एके काळी माजलगांव मध्ये आपल्या सर्वांचे कुलदैवत असलेले श्री खंडोबा मंदीर खंडोबा मैदानात. पाय ठेवायला जागा पुरत नव्हती एवढी मोठी खंडोबा यात्रा. भरत होती आता जागेच्या आभावीमुळे थोड्या प्रमाणात खंडोबा यात्रा भरते. पुरातन दगडी चिरेपासुन माजलगांवच्या खंडोबा मंदिर बनवलेले होते. तेच दगडी चिरे आज पन जशातशे आहेत.मंदीराच्या आत मधील गाभाऱ्यात चिर किवां छिद्र सुध्दा दिसणार नाही आस मजबुत दगडी चिरेच्या बाहेरच्या लगत नवीन बांधकाम केलेले आहे.माजलगांव चे पुरातन खंडोबा मंदीर है 70 वर्षोंच्या पुढचे आहे. खंडोबाच्या समोरचा नंदी सुध्दा पन्नास वर्षाच्या पुढचा आहे. आजही उत्तम स्थितीत आहे. या खंडोबाच्या नंदीच वजन जास्त आहे. पाच जनाला सुध्दा उचलत नाही.श्री खंडोबा देव , म्हालसांदेवी व बानुदेवी या देवाच्यां मुर्ती साक्षात भूतलावर आवतरल्या सारख्या वाटतात. २९ नोव्हेबर रोजी मंदीरात घटस्थापना , ६ दिसंबर रोजी रात्री ७ वाजता २१०० दिपोत्सवचा कार्यक्रम , ७ दिसंबर रोजी चंपाष्टी निम्मित ५ वाजता सकाळी देवाचा महाभिषेक ला सुरुवात होईल सकाळी ७ वाजता खंडोबा मल्हासादेवी ,बाणुदेवी यांचा विवाहचा कार्यक्रम ,व महाआरती सहीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तानी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तुम्ही आम्ही सर्व भक्तजनाने केले आहे.
खंडेरायाला रेवड्या व भंडाराची उधलन.
माजलगांवच्या खंडोबाला चंपाष्टी दिवशी माजलगांवतील आठरा पकड जाती चे भाविक खंडोबा मंदीरात येऊन. सदानंदाचा येळकोट येलकट जय मल्हार चा गजरात रेवड्या भंडाराची उधलन होते. रेवड्या व भंडारा मंदिरावर उधलेला भक्तजन प्रसाद म्हणून घेतात. व आपल्या कपाळावर भंडारा लावतात.
घरोघरी तली भंडारा
माजलगांव शहरातील भाविक आपल्या घरी चंपाष्टी दिवशी. देवाच्या ताब्यांचे कोंटुबाची पुजा करून. वाग्यांचे भरीत, बाजरीची भाकरी, काद्यांची पात. इत्यादी पदार्थाचा नैवेद्य. ठेवुन पाच वेळा सदानंदाचा येळकोट येळकोट जय चा गजर करुन. तली भंडारा कार्यक्रम होतो. व वागीं व कांदा खाण्याची परवानगी मिळते.