माजलगाव ( प्रतिनिधि )
दिनांक 17/11/2024 रोजी पोलीस स्टेशन माजलगांव शहर येथे विधानसभा निवडणुक 2024 चे अनुषंगाने निवडणुक शांततेत पार पाडणेकरीता माजलगाव शहर पोलीस तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवाण व गृहरक्षक यांनी माजलगाव शहरात पोलीस ठाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जुना मोंढा परीसर-वैष्णवी मंगल कार्यालय-बाजार रोड छ. शिवाजी महाराज चौक पोलीस ठाणे माजलगाव शहर असा रुट मार्च घेवुन जनतेमध्ये शर्तीप्रदर्शण करण्यात आले.
विधानसभा निवडणुक 2024 हि शांततेत पार पाडण्याचे माजलगांव शहर पोलीसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.