
.माजलगाव : प्रतिनिधी येथील पंचायत समितीचे माजी सभापती कालवश भिवाजी पौळ यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुकलतिर्थ लिंबगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तर कळसंबर ता.जी.बीड येथील आपला परिवार वृद्धआश्रम आजी-आजोबांना भोजनदान देवुन स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी विवेक भिवाजी पौळ,संजीवनी भिवाजी पौळ, सुजाता विवेक पौळ,माया मिलींद रणदिवे,प्रज्ञा संतोष साळवे,आनंद श्रीराम मोरे,वर्षाताई आनंद मोरे, यांच्यासह आदींची उपस्थीती होती.
यावेळी जिल्हा परिषद शाळा शुकलतिर्थ लिंबगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप विवेक पौळ, भागवत वगरे,किसन वगरे,सरपंच कृष्णा थावरे,अमोल शेरकर,सिद्धार्थ पौळ,भास्कर कांबळे,अभिमान शेरकर, नारायण पांचाळ,प्रकाश खडुळ,मुख्याध्यापक शिंदे सर, कांबळे सर,रत्नपारखी सर,जावळे सर,कर्डीले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
