माजलगाव:( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदानामध्ये शहरातून मोहन दादा जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचे सुधाकरराव देशमुख, बप्पा देशमुख,संतोष काटकर यांनी सांगितले. ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर न लढली जाता स्थानिक मुद्द्यावर व उमेदवारावर लढली जात असल्याने मोहन दादा जगताप यांना ब्राह्मण समाजातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन दादा जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात विविध ठिकाणी कॉर्नर बैठकातून तसेच प्रत्यक्ष मतदार भेटीतून मोहन दादा हे जनतेच्या मनातील उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माजलगाव शहरसह संपूर्ण मतदार संघामध्ये मोहन दादांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार सुधाकरराव देशमुख, बप्पा देशमुख व संतोष काटकर यांनी केले आहे.
Related Posts
मोहनराव जगताप यांना विजयी करून भाजप महायुतीचा बदला घ्या – अमोल डाके, सुनील शिंदे
माजलगाव :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून सत्ता हिसकावून घेणाऱ्या, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्ष व चिन्ह…