माजलगाव : जगताप कुटुंबाने न प असो जी प असो किंवा भाऊ चीं आमदारकी असो जगताप कुटुंबाने 100% प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मोहनदादाना बाजी मारणार असल्याचा विश्वास राहुल जगताप यांनी व्यक्त केला.
मागील सहा महिन्यापासून जगताप कुटुंब विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहे. प्रत्येक आघाडीवर मोहन जगताप यांची सरशी आहे. प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील व खा सुप्रिया सुळे या राज्यपातळीवरील दोन नेत्यांच्या सभा केवळ महाविकास आघाडीचे मोहनराव जगताप यांच्या साठी झाल्या. आ. सोळंकेना महायुतीच्या जिल्या बाहेरील राज्यपातळीवरील एकही नेत्यांची सभा मिळाली नाही. मोहनराव जगताप यांचा निर्धार मेळावा, जयंत पाटील यांची सभा व सुप्रिया सुळे यांची सभा एका हुन एक झाल्या. प्रत्येक सभेत अभूतपूर्व जल्लोष व उत्साह दिसून येत होता.प्रत्येक ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन जगताप कुटुंबियांनी केले यात राहुल जगताप यांचा मोठा वाटा होता. सभा असो प्रचार दौरे असो मेळावे किंवा कॉर्नर सभा प्रचाराच्या प्रत्येक टप्यावर मोहन जगताप आघाडीवर होते.
महाविकास आघाडीच्या पारंपरिक मतदानसोबतच जगताप परिवाराचे मारवाडी ब्राम्हण तसेच आठरा पगड जाती धर्मासोबत असलेले सबंध त्यांना या निवडणुकीत कामी येणार असल्याचा विश्वास राहुल जगताप यांना आहे.
मोहन जगताप यांच्या कडे एक आशादायक नेतृत्व म्हणुन माजलगाव मतदारसंघतील जनता पाहत आहे. त्यामुळे मोहनराव जगताप यांचा या अटीतटीच्या निवडणुकीत विजय पक्का असल्याचा विश्वास राहुल जगताप यांना आहे.
मत रूपी दान माझ्या झोळीत टाका, मी 100% उतराई होईल -मोहन जगताप यांची भावनिक साद
माझ्या अडचणीच्या काळात जे जे माझ्या साठी धावून आले मी त्यांना विसरणार नाही याचे वचन देतो. सर्व मतदारानी माझ्या झोळीत मत रूपी दान टाकावे मी 100% उतराई होण्याचा प्रयत्न करीन. मी उतणार नाही मातणार नहीं घेतला वसा टाकणार नाही याचे वचन देतो. माजलगावं,धारूर, वडवणी तालुक्याचा प्रत्येक प्रलंबित प्रश्न येणाऱ्या 5 वर्षात सोडवला जाईल असेही मोहन जगताप यावेळी म्हणाले.
2004 नंतर प्रथमच स्थानिक उमेदवारात लढत 2004 नंतर 2009 व 2014 ला परळीचे आर टी देशमुख तर 2019 ला केजचे आडसकर भाजप ने माजलगाव वर थोपवले. यावेळी दोन्ही प्रमुख पक्षाकडून स्थानिकचे उमेदवार आहेत शिवाय महायुतीचे आ प्रकाश सोळंके यांना तगडे आवाहन महाविकास आघाडीचे मोहन जगताप यांनी उभे केले असल्यामुळे अपक्ष म्हणुन उभे असलेल्या केजच्या रमेश आडसकर यांना मतदार स्वीकारणार नाहीत.