आठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे मोहन जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करा-माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे, गोविंद करवा, अरुण इंगळे, राजाभाऊ वापटे

माजलगाव : जगताप परिवार हे मागील 30 वर्षांपासून न.प असो जी.प असो किंवा लहानात लहान निवडणूक असो आठरा पगड जाती च्या लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिले आहे. 1998 ला व 2007 ला न.प ताब्यात आल्यानंतर सर्वाधिक कामे जगताप यांच्या मुळे मार्गी लागले.

आठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे मोहनराव जगताप हे एकमेव व्यक्तिमत्व आहेत.त्यामुळे आठरा पगड जाती जमातीनी मोहनराव जगताप यांना निवडून द्यावे असे आवाहन ठिकठिकाणी झालेल्या कॉर्नर बैठकीत माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे माजी नगरसेवक गोविंद करवा, माजी जी प सभापती अरुण इंगळे, राजाभाऊ वापटे यांनी केले.

महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही स्थितीत येणार आहे. येणाऱ्या सत्तेत आपला प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. मारवाडी ब्राम्हण वानी, कोमटी, म्हणुन माजलगाव विधानसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांना विजयी करा असे आवाहन ठिकठिकाणी झालेल्या कॉर्नर सभेत माजी नगराध्यक्ष नाना भाऊ शिंदे अरुण इंगळे गोविंद करवा, राजाभाऊ वापटे यानी केले.