माजलगाव,दि.(प्रतिनिधी) माजलगाव शहरातील जुन्या काळातील आयुर्वेदाचार्य डाॅ.चंदुलालजी तोष्णीवाल यांचे गुरुवारी सकाळी वृध्दाप काळाने दु:खद निधन झाले.त्यांचा उठावना शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी ठेवण्यात आला आहे. माजलगाव शहरात जुन्या काळात आयुर्वेदाचार्य म्हणुन परिचित असलेले डाॅ.चंदुलालजी झुंबरलालजी तोष्णीवाल वय ८७ वर्षे हे गेल्या कांही महिन्यांपासुन वृध्दाप काळाने व अल्पशा आजाराने त्रस्त होते.त्यांच्यावर उपचार ही करण्यात आले होते.परंतु ते वयोवृद्ध असल्याने त्यांची प्रकृती उपचारास साथ देत नव्हती.त्यातच गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची प्रकृती खुपच खालावली. व त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले.त्यांच्यावर गुरुवार सायंकाळी शहरातील राजस्थानी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्वस्तरातील लोक उपस्थित होते.स्व.डाॅ.चंदुलालजी तोष्णीवाल हे आयुर्वेदाचार्य होतेच. शिवाय ते व्यावसायिक ही होते.माजलगाव शहरात त्यांचे मेडिकल दुकान होते.ते धार्मिक वृत्तीचे शांत व सर्वांशी मिळुन मिसळून राहणारे व्यक्तीमत्व होते.स्व.चंदुलालजी हे माजलगावचे प्रसिद्ध डाॅ.गंगाभिषणजी तोष्णीवाल यांचे बंधु होते तर माजी नगरसेवक दयानंदजी तोष्णीवाल यांचे चुलते तर संजय तोष्णीवाल व रामचंद्र तोष्णीवाल यांचे वडिल होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना,दोन मुली, जावई, नातरूंड असा मोठा परिवार आहे. *उद्या उठावना* स्व.चंदुलालजी तोष्णीवाल यांचे गुरुवारी दु:खद निधन झाले असुन, त्यांचा उठावना कार्यक्रम शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता राजस्थानी मंगलकार्यालय येथे ठेवण्यात आल्याचे शोकाकुल तोष्णीवाल परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
Related Posts
आठरा पगड जातीचा माजलगांवचा देव खंडोबा. -चंपाष्टी निम्मित मंदीरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
माजलगांव (प्रतिनिधी ) शहरातील पुरातन सर्वांचे कुलदैवत व आराध्य दैवत जागृत देवस्थान श्री. खंडोबा मंदीरात 29 नोव्हेबर शुक्रवार रोजी भक्तांचा…
मतपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी सेवेतून निलंबन
बीड दि.17: आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक 101186 सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईच्या सशस्त्र पोलिस ताडदेव येथील पोलिस गणेश…
2014-19 चा काळ आठवा, उपऱ्या उमेदवारास थारा देऊ नका – माजी आमदार बाजीराव जगताप
माजलगाव ( प्रतिनिधी ) 2014 ते 19 या काळात उपरा उमेदवार आमदार केल्यामुळे माजलगाव मतदारसंघतील जनतेने खूप काही भोगलं आहे.…