छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी )
आज दि. २७/१२/२०२४ रोजी त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायण यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, छ. संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, छ. संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने काल प्रसिद्ध झालेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाच्या शासन निर्णय क्र. बीसीएच-२०१६/प्र.क्र.३९३/शिक्षण-२ दि.२६/१२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातीलस्वाधार योजनेसाठी लावलेल्या जाचक अटी काढून टाकणे बाबत मागणी करण्यात आली, दि.२६/१२/२०२४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे वय वर्षे ३० पेक्षा अधिक वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच २ वर्षा पेक्षा जास्त खंड असलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही, ह्या दोन अटी अत्यंत जाचक आहेत कारण जे विद्यार्थी-विद्यार्थिनी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाच्या प्रवाहतून बाहेर पडले होते ते विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत झाली कित्येक विद्यार्थी आपले उरलेले शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय करू लागले.
मात्र काल निघालेल्या शासन निर्णय क्र.बीसीएच-२०१६/प्र.क्र.३९३/शिक्षण-२ दि.२६/१२/२०२४ शासन निर्यात नमूद असलेल्या वरील काही अटी रद्द करून योजनेचा लाभ पूर्ववत द्यावा अशी मागणी निवेदनातून त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायण यांनी केली आहे.यावेळी सोबत ऍड.रितेश शेळके, ऍड. गौतम साळवे, विलास जनबंधु आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व सामाजीक बांधिलकी जपत मा.सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री महोदयांनी योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थी व पालक यांना दिलासा द्यावा.